Punjab Election : पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅप्टन अमरिंदर सिंह
पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळुन..."

पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

Punjab Election 2022 : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी (Captain Amarinder Singh) पंजाब विधानसभा निवडणुक (Punjab Assembly Election 2022) लढण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते पटियाला मतदारसंघातून लढणार असल्याचे रविवारी त्यांनी घोषित केले. पटियाला मतदारसंघ हा त्यांचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो.

हेही वाचा: तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा: किरीट सोमय्या

न्युज 18 या वृत्तवाहिनीशी बोलताना सिंह म्हणाले की, "मी पळुन जाणाऱ्यातील नाही." सिंह यांनी चारवेळा पटियाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, त्यांची पत्नी परनीत कौर यांनी 2014 मध्ये येथुन निवडणुक जिंकल्या होती. कॅप्टन अमरिंदर सिंह हे कॉग्रेसच्या बलाढ्य नेत्यांपैकी एक होते. पंजाब कॉग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दु यांच्या सोबत झालेल्या तीव्र संघर्षानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

हेही वाचा: मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख,'या' राज्याची घोषणा

तदनंतर, पंजाबच्या मुख्यमंत्री पदी चरणजीत सिंह चन्नी यांची वर्णी लागली. आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कॉग्रेसला सोडचिठ्ठी देत पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या 'पंजाब लोक कॉग्रेस पक्षा'ची घोषणा केली. अमरिंदर सिंह यांनी सांगितले, त्यांचा पक्ष सर्व 117 विधानसभेच्या जागा लढणार आहे. तसेच, 2022 मध्ये होणाऱ्या पंजाब निवडणुकीत त्यांचा पक्ष भाजप सोबत युती करु शकतो.

loading image
go to top