Chh. Sambhajinagar Accident : हतनूर टोलनाक्याजवळ दुचाकी-कार अपघात, एक ठार, एक गंभीर!
Accident News : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर टोलनाक्याजवळ दुचाकी व कारमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात एक तरुण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
हतनूर (ता. कन्नड) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर हतनूर टोलनाक्याजवळ दुचाकी-कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. गुरुवारी (ता. २६) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.