Chhatrapati Sambhajinagar Crime : जमिनीच्या वादातून वडिलांना मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Family Dispute Over land : जयसिंगने जमीन नावावर करून देण्याची मागणी आईवडिलांकडे केली होती. मात्र, दोघानींही जमीन नावावर करून देण्यास नकार दिला.
father beaten up over land dispute case registered against son police
Chhatrapati Sambhajinagar CrimeSakal

Chhatrapati Sambhajinagar : जमीन नावावर करून देण्याची मागणी करत मुलाने आईवडिलांना मारहाण केल्याची घटना २६ जूनला घडली होती. वडिलांना जबर मार लागल्याने त्यांचा ३० जूनला उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईच्या तक्रारीवरून मुलावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंग कल्याण राठोड असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. तर कल्याण बाळा राठोड असे मृत वडीलांचे नाव आहे.

चंद्रकलाबाई कल्याण राठोड यांनी दिलेल्या तक्रारीचा आशय असा : जयसिंगने जमीन नावावर करून देण्याची मागणी आईवडिलांकडे केली होती. मात्र, दोघानींही जमीन नावावर करून देण्यास नकार दिला. २६ जूनला रात्री जयसिंगने चंद्रकलाबाई व कल्याण राठोड यांना जबर मारहाण केली. यात कल्याण राठोड गंभीर जखमी झाले होते.

father beaten up over land dispute case registered against son police
Chhatrapati Sambhajinagar : भेटण्यासाठी आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीने मैत्रिणीच्या घरातच संपवले जीवन; कारण अद्याप अस्पष्ट

त्यांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात हलवण्यात आले. तीन दिवसानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंद्रकलाबाई राठोड यांच्या तक्रारीवरून जयसिंग राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हर्सूल पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com