
छत्रपती संभाजीनगर : भांडणानंतर बेशुद्ध झालेल्या सासऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो असे सांगत हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल न करता तसेच वाहनात ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाला. १ मे रोजी रात्री अकराला गुलमोहर कॉलनी, सिडको एन-५ भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी जावयाविरुद्घ सिडको पोलिस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.