Investment Scam : अधिक नफ्याचे आमिष; ११ लाखांचा गंडा, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची थाप मारून फसवले
Financial Fraud : पाच टक्के नफ्याचे आमिष दाखवून ग्रो एम्पोयर कंपनीच्या चालक पिता-पुत्राने दोन गुंतवणूकदारांची ११ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीवर पाच टक्के नफ्याचे आमिष दाखवून ग्रो एम्पोयर कंपनी चालक पिता-पुत्राने दोघांना ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले.