
छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण विभागात उपायुक्तपदी कार्यरत असलेल्या जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध एका सफाई कामगार महिलेच्या गंभीर तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. कौशल्या गायकवाड या महिला कर्मचाऱ्याने जयश्री सोनकवडे यांच्यावर शासकीय ड्युटीदरम्यान घरकाम आणि मसाजसाठी सक्ती केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे आणखी चर्चेत आले आहे.