
औरंगाबाद : नाथसागरात सध्या ५२ टक्के साठा
पैठण - यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणामधील पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून नाथसागर धरणातून टप्याटप्याने पाण्याचा शेती सिंचन, औद्योगिक व पिण्याच्या पाण्यासाठी वापर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नाथसागर धरणात ५२.६१ टक्के साठा शिल्लक आहे. नाथसागर धरणातून विविध शहरांना पिण्यासाठी व वाळूज , शेंद्रा , पैठण , जालना औद्योगिक वसाहतीसाठी दररोज ०२८९ दलघमी एवढा पाणीपुरवठा होत आहे. धरणात सध्या ५२.६१ टक्के साठा आहे. नाथसागराची पातळी १,५२१ फूट आहे. आजपर्यंत मागील वर्षी ५१.४० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. तसेच मागील दोन महिन्यांपूर्वी ता. २८ फेब्रुवारी २०२२ मध्ये ७७.९९ तर ता. ३१ मार्च २०२२ रोजी ६५.७० टक्के पाणीसाठा होता.
दरम्यान, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच नाथसागर धरण १०० टक्के भरले होते . दरम्यान , यावर्षी वाढते तापमान व पाण्याची मागणी याचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा , असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाठ, धरण अभियंता विजय काकडे, पाणी पातळी मोजणीदार गणेश खराडकर, अब्दुल बारी गाजी यांनी केले आहे.
तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर कमालीचा वाढला असून, तो १.५५ मिमी अशा उच्चांकीस्तरावर पोचला आहे . त्यामुळे धरणसाठ्यातील पाणीपातळी खालवत आहे. बाष्पीभवनाचा दर एप्रिल महिन्यात वाढला आहे. परिणामी धरणातील पाणी साठा कमी होत आहे.
- विजय काकडे, धरण अभियंता, नाथसागर, पैठण.
Web Title: Fifty Two Percentage Water Stock In Nathsagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..