esakal | संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा | Aurangabad News
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद -  चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव-तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा

sakal_logo
By
अनिल गाभूड

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : चिखल झालेल्या रस्त्यातूनच मार्गक्रमण करून पैठण (Paithan) तालुक्यातील नवगाव, तुळजापूर येथील नातेवाईकांना तरुणीची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नवगाव तुळजापूर येथे रविवारी सकाळी स्वाती संजय घोडेराव (वय २२) हिचे निधन झाले होते. दुपारी अंत्यसंसकार करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या (Aurangabad) पाण्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे.

हेही वाचा: अहमदपूर तालुक्यात नदीत बुडून महिलेचा मृत्यू

नाईलाजाने नातेवाईकांना अंत्ययात्रा चिखलातून काढण्याची वेळ आली. यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

loading image
go to top