अहमदपूर तालुक्यात नदीत बुडून महिलेचा मृत्यू

रेखा हरीबा मेथे
रेखा हरीबा मेथेRekha Methe
Updated on: 

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यात (Ahmedpur) होत असलेल्या पावसाच्या पाण्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत असून पावसाचे पाणी विनाशकारी ठरत आहेत. पाण्यात पडून रविवारी (ता.तीन) एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली आहे. मागील आठ दिवसापासून होत असलेल्या पावसाने सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील सताळा येथील रेखाबाई हरीबा मेथे ( वय 56 वर्ष)  या गावालगत (Latur) असलेल्या मन्याड नदी पात्रात धुणं धुण्यासाठी गेल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सताळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

रेखा हरीबा मेथे
तुळजाभवानी मातेच्या नवरात्रास गुरूवारपासून होणार प्रारंभ

मृताचा मुलगा सिध्दार्थ हरीबा मेथे यांच्या माहितीवरून किनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे या अगोदर 7 सप्टेंबर रोजी हगदळ येथील मारोती मल्हारी कांबळे ( वय 40 ) व मौजे मावलगाव येथील बंडू सोपान केंद्रे ( 48 ) , तर 28 सप्टेंबर रोजी विळेगाव येथील गंगाराम सोपान तरूडे ( 37 ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

jewellery theft
bhatkheda lake water
manoj jarange patil, devendra fadnavis and eknath shinde
Substandard Mid-Day Meal Supply Exposed Panchayat Samiti Chairmans School Inspections
Marathi News Esakal
www.esakal.com