esakal | मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले
sakal

बोलून बातमी शोधा

Sword-wielding arrested

मित्राच्या वाढदिवसादरम्यान तलवार घेऊन नाचणे दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले. जिन्सी पोलिसांनी दोघा संशयितांपैकी एकास अटक करण्यात आली आहे.

मित्राच्या वाढदिवसाला तलवार घेऊन नाचले, अन बाराच्या भावात गेले

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: मित्राच्या वाढदिवसादरम्यान तलवार घेऊन नाचणे दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले. जिन्सी पोलिसांनी दोघा संशयितांपैकी एकास अटक करण्यात आली आहे. शेख मुद्दसीर अब्दूल खादीक (१९, रा. रहेमानिया कॉलनी) असे अटकेतील संशयिताचे नाव असून इलियास ऊर्फ इल्लू अझहर मौलवी पटेल (२०, रा. रहेमानिया कॉलनी) हा पसार झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावमध्ये अघोषित संचारबंदी

ही घटना १२ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता किराडपूऱ्यात घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किराडपुऱ्यातील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानात रिजाय नावाच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुण तलवार घेऊन नाचणार असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एम. केंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार केंद्रे यांनी एक पथक तयार करुन वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे रवाना केले. दरम्यान पथक संबंधित ठिकाणी गेले असता, दोघेही संशयित तलवार घेऊन नाचत होते.

पोलिसांनी शेख मुद्दसीर याला अटक केली. तर इलीयास ऊर्फ इल्लू हा घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्दसीर याच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शेख करत आहेत. ही कारवाई निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार संपत राठोड, अंमलदार हारुण शेख, नाईक संजय गावंडे, धनंजय पाडळकर, नंदू चव्हाण, संतोष बमनात यांनी केली.

वीरशैव तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शांतीतिर्थ स्वामी यांचे निधन, आज चाकूरमध्ये अंत्यसंस्कार

(Edited By -Sushen Jadhav)

loading image
go to top