esakal | चिमुकल्यांचा खेळताना झाला घात, दोघा सख्खा भावांसह तिघांचा..| Aurangabad Updates
sakal

बोलून बातमी शोधा

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील वानेगाव परिसरात गिरजा नदी पात्रावरील पुलानजीक खेळत असताना दोन सख्ख्या भावासह तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

चिमुकल्यांचा खेळताना झाला घात, दोघा सख्खा भावांसह तिघांचा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील (Phulambri) वानेगाव परिसरात असलेल्या गिरजा नदी पात्रावरील पुलानजीक खेळत असताना दोन सख्ख्या भावासह तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.सहा) रोजी घडली आहे. दरम्यान दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडले असून एका मुलाची रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. गौरव साहेबराव पाचवणे (वय 7), विजू साहेबराव पाचवणे (10) यांचे मृतदेह सापडले, तर निलेश अंकुश शेजवळ ( 6) याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील येथील गिरीजा नदी (Aurangabad) पात्रात पूल आहे. मागील गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे गिरीजा नदी पात्रातील पूल तुटलेला आहे. त्यामुळे वानेगाव ते इतर गावांचा संपर्क तुटलेला आहे.

हेही वाचा: नांदेड-अर्धापूर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार,वाहतूक ठप्प

गिरीजा नदी पात्रातील तुटलेल्या पुलावर गावातील महिला कपडे धुण्यासाठी गिरिजा नदीपात्रातील तुटलेल्या फुलावर धुतात. गिरीजा नदी पात्रातील तुटलेल्या पुलावर कपडे धुण्यासाठी मुक्ताबाई रामभाऊ शेजवळ या आजी आपला नातू निलेश अंकुश शेजवळ याला घेऊन गेली होती. निलेश शेजवळ याच्यासोबत त्याचे मित्र विजू साहेबराव पाचवणे व गौरव साहेबराव पाचवणे हे दोघे सख्खे भाऊ गेले होते. आजी कपडे धुत असतांना आजी भोवती ही तिघे चिमुकले खेळत होती. मात्र खेळता - खेळताच या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे या पाण्यात बुडुन चिमुकल्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. कपडे धुत असतांना आजीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर या घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एनडीआरएफ पथकाला पाचारण केले. तत्पूर्वी एका मुलाचा मृतदेह पाण्यात वाहून जातांना नागरिकांनी काढला. तर एनडीआरएफने एका चिकल्याला बाहेर काढले. तर निलेश अंकुश शेजवळ या मुलाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेणे सुरू होते. विजू साहेबराव पाचवणे व गौरव साहेबराव पाचवणे या दोघांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात होते.

loading image
go to top