esakal | नांदेड-अर्धापूर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार,वाहतूक ठप्प | Nanded Accident News
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर : नांदेड- अर्धापूर रस्त्यावरील आसना पूलाजवळ झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

नांदेड-अर्धापूर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार,वाहतूक ठप्प

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील आसना पुलाजवळ झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.सहा) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. हे दोघे राहणार बारड (ता.मुदखेड) येथील आहेत. या अपघातामुळे नांदेड-अर्धापूर (Ardhapur) मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची महामार्ग सुरक्षा पथक, वसमत फाटा यांच्या कडून मिळालेल्या (Nanded) माहितीनुसार नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील आसना पुलाजवळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी (एमएच २६ झेड ०७६०) व ट्रकचा अपघात झाला.

हेही वाचा: 'अनेकांनी काँग्रेस संपवण्याची भाषा केली,पण कधीच संपली नाही'

या अपघातात दुचाकीस्वार तुळशीदास बालाजी पुरी (वय ३५, रा.बारड ता मूदखेड) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू, तर त्यांच्या पत्नी कल्पना तुळशीदास पुरी (वय ३०, रा.बारड, ता. मुदखेड) या किरकोळ जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच रमाकांत शिंदे, वडजे, कात्रे व सेवक वसंत शिनगारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जखमी झालेल्या कल्पना पुरी यांना शासकीय रुग्णालय, नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

loading image
go to top