esakal | सीसीटीव्ही बसवा, सुरक्षेचे नियम पाळा; मंगल कार्यालय व्यावसायिकांना पोलिस आयुक्तांच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Police Commissioner Nikhil Gupta

मंगल कार्यालय मोठे गर्दीचे ठिकाण असून तेथे नियमांचे पालन करण्यासह सुरक्षाविषयक सर्व बाबींचे पालन करा, अशा सूचना पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी केल्या.

सीसीटीव्ही बसवा, सुरक्षेचे नियम पाळा; मंगल कार्यालय व्यावसायिकांना पोलिस आयुक्तांच्या सूचना

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : मंगल कार्यालय मोठे गर्दीचे ठिकाण असून तेथे नियमांचे पालन करण्यासह सुरक्षाविषयक सर्व बाबींचे पालन करा, अशा सूचना पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी केल्या. मंगल कार्यालय चालकांची पोलिस आयुक्तालयात आज (ता. २१) बैठक घेण्यात आली. यात शहरातील ७० ते ८० व्यावसायिकांची उपस्थिती होती. शहरातील बहुतांश मंगल कार्यालयांना स्वतःची पार्किंग नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने लावली जातात.

त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच वाद्य नियमापेक्षा अधिक आवाजात वाजविणे, याशिवाय मंगल कार्यालयात होणारी चोरी, दूचाकी चोरी, इतर गुन्हेगारी कृत्य याला पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही लावावे. सुरक्षारक्षक नेमावे तसेच इतर सुरक्षाविषयक सुचनांचे पालन करावे तसेच मंगल कार्यालयात काम करणाऱ्यांची पूर्ण माहिती ठेवावी, असेही बैठकीत त्यांनी सांगितले. एखादी घटना घडल्यास त्याची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी याबाबत मंगल कार्यालय चालकांना कलम १४९ नुसार नोटीसही देण्यात आली आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image