
धाराशिव : थोड्या प्रयत्नानंतर वाघाला पकडण्यात येईल, अशा विश्वासाने प्रयत्न करणाऱ्या वन विभागासह रेस्क्यू पथकाची मात्र चांगलीच दमछाक झाली. आठवडाभर प्रयत्न करूनही वाघाला पकडण्यात अपयश आलेले ताडोबातील रेस्क्यू पथक रिकाम्या हाताने परतले आहे. आता नव्या दमाचे पुण्याचे पथक धाराशिवमध्ये आले असून, राज्य स्तरावरील मुख्य अधिकारीही आज वाघोबाचा आढावा घेण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे वाघोबाला पकडणे एवढेही सोपे नसून, ही मोहीम पार पाडणे वन विभागासाठी चांगलेच कसरतीचे ठरत आहे.