Paithan Accident: पैठणच्या माजी उपनगराध्यक्षांसह शिक्षकाचा दुचाकी अपघातात मृत्यू
पैठणमधील भीषण अपघातात नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झाला. रात्री कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.
जायकवाडी: पैठण शहरातील शशिविहार वसाहतीच्या गेटसमोर कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे यांच्यासह शिक्षकाचा मृत्यू झाला.