
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यात माजी मंत्रीही लाभधारक असल्याचे समोर आले. शहागंज बसस्टॅँडच्या मागे २० हजार चौरस फूट भूखंडावरील आरक्षण हटविण्यात आले. हा भूखंड ए.एम. अजंठा कन्स्ट्रक्शनचे संचालक तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले.