esakal | जालना जिल्ह्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, आईची पोलिसांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जालना जिल्ह्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, आईची पोलिसांकडे तक्रार

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : देवगाव (ता.बदनापूर) (Badanapur) येथे घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर बळजबरीने घरात उचलून नेत एकाने अत्याचार केला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध मंगळवारी (ता. १४) बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात (Crime In Jalna) तक्रार दिली. त्यानुसार, अल्पवयीन मुलगी (Crime Against Girl)मंगळवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता घरासमोर कोंबड्यांना दाणे टाकत होती. तेव्हा संशयित अनवर खाँ कादर खाँ पठाण (रा. देवगाव) याने तिचे केस धरून ओढत आपल्या घरात नेले.

हेही वाचा: बनवा दही ब्रेड उपमा, जिभेबरोबर पोटाचीही काळजी

त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी अधिक तपास महिला फौजदार पी. डी. तुपे करीत आहेत.

loading image
go to top