esakal | अनर्थ टळला! रेल्वेने मुंबईला पळून चाललेल्या चार अल्पवयीन मुली ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

अनर्थ टळला! रेल्वेने मुंबईला पळून चाललेल्या चार अल्पवयीन मुली ताब्यात

sakal_logo
By
अविनाश संगेकर

लासूर स्टेशन (औरंगाबाद): येथे औरंगाबादच्या हेगडेवार मुलींच्या वसतिगृहातील चार अल्पवयीन मुली शुक्रवारी (ता.16) तपोवन एक्स्प्रेसने मुंबईला पळून जात असताना लासूर येथे शिल्लेगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्या. दुपारी साडेतीनच्या तपोवन एक्स्प्रेसने या मुली मुंबईला निघाल्या होत्या. मुंबईच्या असणाऱ्या या मुलींपैकी कुणाची आई तर कुणाच्या वडीलांचे निधन झालेले आहे. या चारही अनाथ मुली औरंगाबादला वसतिगृहावर राहत होत्या. वसतिगृहातून नातेवाईकांनाही बोलता येईना व कोणी भेटायला पण येत नसल्याने अखेर या चौघी मुंबईला नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या.

शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून दुपारी तीनच्या सुमारास निघालेल्या तपोवन एक्सप्रेसमधून चार अल्पवयीन मुली या मुंबईला पळून जात असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना पोलिसांच्या ग्रामीण कंट्रोलनी कळवले. तपोवन एक्सप्रेसने या चार लहान मुली कोणाला काही न सांगता पळून चालल्या होत्या.

हेही वाचा: मंत्री परब म्हणतात, एसटीच्या खाजगीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही

शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सविता वरपे, विठ्ठल जाधव यांनी आरती विश्वास शेकटे (वय10), उजाला अजय घोटे (वय13), निलम विश्वास सकटे (वय 11), श्रुती संजय कार्या (वय 12) यांना ताब्यात घेतले आहे. या मुली मुंबईच्या असून औरंगाबादला वसतिगृहात असताना कोणालाही न सांगता मुंबईला रेल्वेने नातेवाईकांकडे पळून जात होत्या असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

loading image