
छत्रपती संभाजीनगर : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लाखो ठेवीदारांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात ठेवीदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अकरा जणांनी याचिका दाखल केल्या आहेत. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीत ईडी, केंद्र शासन, राज्य शासनासह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्ती मनीष पितळे, न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत.