esakal | दारुसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून, औरंगाबादेतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

The murder of a friend for not paying for alcohol was revealed two years later

दारुसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून, औरंगाबादेतील घटना

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून दोघाजणांनी मित्राचा (Aurangabad) खून केल्याची घटना रविवारी (ता.बारा) मध्यरात्रीनंतर कांचनवाडी परिसरात घडली. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर काकडे (रा. नक्षत्र पार्क, नक्षत्रवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार काकडे यांचा मुलगा महेश (वय १८) हा त्याचा मित्र राहूल याच्यासोबत एका इमारतीत दारु पित बसले होते. त्याठिकाणी महेशचा दुसरा मित्र विकास रहाटकर (रा. कांचनवाडी) हा पुर्वीपासूनच त्या ठिकाणी दारु पित होता. त्यानंतर थोड्याच वेळात विकासचा मित्र संदीप उर्फ गुज्जर मुळेकर (रा. कांचनवाडी) हा देखील त्या ठिकाणी आला. त्यानंतर चौघांनी सोबत दारु प्राशन केली. दारू संपल्याने विकासने (Crime In Aurangabad) महेशला पुन्हा दारु आणण्यासाठी पैसे मागीतले. मात्र महेशने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विकास व संदीपने महेशचे केस धरुन त्याचे डोके स्लॅबवर आदळले. त्यानंतर संदीपने महेशच्या डोक्यात विटा घातल्या, त्यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी महेशचा मित्र राहूल याने मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र त्यालाही दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात (Satara Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: सहायक पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गिरीला लाच घेताना पकडले

आरोपी तात्काळ अटकेत

घटनेच्या अनुशंगाने माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी विकास रहाटवाड, संदीप उर्फ गुज्जर मुळेकर (रा. दोघे, कांचनावाडी) यांना अटक करुन सातारा पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त मिना मकवाना, रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, जमादार किरण गावंड, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड, निति देशमुख यांनी ही कामगीरी केली.

loading image
go to top