esakal | सहायक पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गिरीला लाच घेताना पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक पोलिस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले

सहायक पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गिरीला लाच घेताना पकडले

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक गोकुळ बाबुराव गिरी (Assistance Police Sub Inspector) यांनी चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) त्यांना रंगेहाथ पकडले. याविषयी अधिक माहीती अशी की, यातील तक्रारदार, त्यांचे भाऊ व वडील यांच्याविरूद्ध तामलवाडी पोलिस ठाणे (ता.तुळजापूर) (Tuljapur) येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्या दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये (Osmanabad) तक्रारदार त्यांचा भाऊ व वडील यांच्यावर कारवाई न करण्यासाठी श्री.गिरी यांनी चार हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले. पंचासमक्ष चार हजार रूपये स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: बैलांनी बैलगाडी नेली थेट तलावात,शेतकऱ्यासह गाईचा बुडून मृत्यू

सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा पथकामध्ये पोलिस अंमलदार अर्जुन मार्कंड, मधुकर जाधव, शिद्धेस्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

loading image
go to top