
बिडकीन : सोबत नोकरी, दोन वर्षांची मैत्री आणि दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाचा खेळ खल्लास केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २८) गेवराई तांडा परिसरात घडला. दीपक दत्तू कांबळे (वय २५, रा. पैठणखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, आरोपीचे नाव रवींद्र सुभाष बोर्डे (वय २५, रा. शेंद्रा कमंगर) असे आहे.