Success Story : वर्तमानपत्रे वाटणारा तरुण झाला जिल्हा परिषद शिक्षक; वासुदेव मुळीक यांच्या मेहनतीला यश
Newspaper Boy To Government Teacher : अडीच एकर शेती, हलाखीची परिस्थिती, तरीही ‘कमवा आणि शिका’ योजनेतून वासुदेव मुळीक यांनी शिक्षण घेतलं. वर्तमानपत्र वाटत वाटत शिक्षकी परीक्षेत यश मिळवून पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून निवड झाली.
छत्रपती संभाजीनगर : ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर यशात अडथळा येत नाही, हेच करचुंडी (ता. बीड) येथील वासुदेव प्रभू मुळीक यांनी कृतीतून दाखवून दिले. अल्पभूधारक कुटुंबात जन्म झालेल्या वासुदेव यांनी मिळेल ती कामे केली.