

Young and Determined: Rishikesh Makes Political Mark at 22
Sakal
-योगेश बरीदे
परतूर (जि. जालना) : शहरातील प्रभाग दोनच्या गल्लीबोळांत वाढलेला, वजनकाट्यावर केवळ सहा हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने संघर्ष, वेदना आणि जिद्दीच्या बळावर राजकारणात नवी ओळख निर्माण केली. ऋषिकेश बापूराव कऱ्हाळे असे त्याचे नाव. ऋषीकेशने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ८०२ मतांनी बाजी मारत तरुण वयातच नगरसेवक होण्याचा मान मिळविला.