

Chhatrapati Sambhajinagar
esakal
फुलंब्री: शहरात अवैध पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, केवळ दंडात्मक कारवाईने हा प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने आता नियोजित पार्किंगची ठोस उपाययोजना राबविण्याची वेळ आली आहे. विशेषतः महामार्गालगत आणि मुख्य चौकांमध्ये पार्किंगसाठी जागा निश्चित करून मार्किंग करण्याची मागणी जोर धरत आहे.