

Illegal Sand Mining Truck Escapes Despite Seizure Action in Sawangi
sakal
फुलंब्री : तालुक्यातील सावंगी परिसरात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध कारवाई दरम्यान महसूल पथकावर वाळू माफियांनी दादागिरी करत धमक्या दिल्या व ट्रक पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.चार) मध्यरात्री घडला. या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी महसूल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. वरुडकाझी येथील मंडळ अधिकारी विश्वनाथ वसंतराव नागुर्डे (वय ३९) हे सहकारी महसूल अधिकारी राजू काळे (ग्राम महसूल अधिकारी, महालपिप्री) व रवी लोखंडे यांच्यासह परिसरात गस्त घालत होते.