

Chhatrapati Sambhajinagar
esakal
फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर-जळगाव या वर्दळीच्या महामार्गावरील फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात काही बेशिस्त चालकांमुळे, अनधिकृत हातगाडे आणि कुठेही होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे रविवारी (ता. १२) प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या गोंधळामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. चौकाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले होते.