
छत्रपती संभाजीनगर : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नव्या टप्प्याला सुरवात होताच संकेतस्थळ पुन्हा एकदा कोलमडले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत पहिल्याच दिवशी तब्बल २ लाख ५८ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र, या गर्दीचा भार पेलण्यात संकेतस्थळाला अपयश येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.