
Ganesh Visarjan 2025
Sakal
केज : विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर ठेवण्यासाठी केज पोलिसांकडून शनिवारी (ता.०६) शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणूका शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील चौका- चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच आता ड्रोन, वॉच टॉवर आणि टोईंग व्हॅन पोलीसांच्या मदतीला असणार आहे.