दिल्लीतून केबल चोरीसाठी थेट औरंगाबादेत आली टोळी ; पोलिसांची कारवाई

‘बीएसएनएल’ला गंडा घालणाऱ्या १९ जणांचा समावेश
gang came directly to Aurangabad for cable theft from Delhi Police action
gang came directly to Aurangabad for cable theft from Delhi Police actionsakal
Updated on

औरंगाबाद : बीएसएनएल कंपनीची लाखो रुपये किमतीची ऑप्टिकल फायबर केबल औरंगाबादसह विविध शहरांत चोरी करणाऱ्या तब्बल १९ जणांच्या दिल्ली येथील टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. औरंगाबादसह महाराष्ट्र व देशभरात अशा प्रकारे या टोळीने केबल लांबविल्याचे तपासात उघड झाले. ही कारवाई शनिवारी (ता. पाच) पहाटे प्रतापनगर स्मशानभूमीजवळ करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

शहरात ३१ डिसेंबर रोजी या टोळीने अमरप्रीत चौक ते काल्डा कॉर्नर भागातील बीएसएनएलचे वीस लाखांचे भूमिगत केबल लांबविले होते. याप्रकरणी बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता नंदकुमार गोकुळचंद संघई (रा. शहानूरवाडी) यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासात चोरट्यांनी चिकलठाणा भागातून भाडे तत्त्वावर घेतलेले क्रेन गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केले. या क्रेनचालकाच्या चौकशीतून टोळीतील सदस्यांचे मोबाइल क्रमांक मिळाले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी हीच टोळी पुन्हा शहरात आल्यानंतर पाळत ठेवून कारवाई करण्यात आली.

पोलिसांची तत्परता

औरंगाबादेतून केबल लांबविल्यानंतर कोल्हापूर आणि नगर शहरातही रेकी केली. तसेच नगर येथील एका क्रेनचालकाला आगाऊ रक्कम दिली होती. तत्पूर्वी ही टोळी औरंगाबादेत पुन्हा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, प्रतापनगर स्मशानभूमीजवळ शनिवारी (ता. पाच) पहाटे पोलिसांनी कार (एचआर-५५, एएच-०३३१) आणि टेम्पो (यूपी-१७, एटी-७४५५) अडवला. त्यावेळी तिघांनी पळ काढला. तर दोन विधीसंघर्ष बालकांसह १७ जणांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून केबल तोडण्याचे हत्यार कटावनी, हातोडा, टिकाव, हेल्मेट, लाइट रिफ्लेक्टर, केशरी रंगाचे रिफ्लेक्टर जॅकेट, हेक्सा बेल्ड, कटिंग ब्लेड, लोखंडी संबल, छन्नी असे साहित्य हस्तगत केले.

अशी आहे टोळी

दिल्लीतून कारभार चालविणाऱ्या टोळीचा म्होरक्या साकीब गयासऊद्दीन (रा. बिहार) हा आहे. त्याच्या टोळीत अशिक्षित व मजूर सदस्य सक्रिय आहेत. केबल चोरण्यासाठी त्याने दोन वेगवेगळ्या टोळ्या तयार केल्यात. पोलिसांनी पकडलेल्या टोळीत साकीबसह चालक कृष्णप्रसाद श्रीरामसुंदर गुप्ता (रा. दिल्ली), टेम्पोचा चालक प्रदीपकुमार नरेंद्र रामकुमार (रा. दिल्ली), सहचालक सुरजकुमार छोटू प्रसाद (रा. मेहनगर, जि. आझमगड), प्रमोद लक्ष्मी पासवान (रा. बिहार), मोहम्मद अरमान (रा. बिहार), मोहम्मद तय्यब, मोहम्मद मकसूद, मोहम्मद हयात, मोहम्मद इजाईल, मोहम्मद मुस्तफा, मोहम्मद इस्माईल (सर्व रा. दिल्ली), मोहम्मद शाहीद, मोहम्मद शहजाद व मोहम्मद रक्कोव आलम (दोघेही रा. उत्तरप्रदेश), मोहम्मद इश्तेखार (रा. दिल्ली) आणि मोहम्मद जाहेद (रा. दिल्ली) अशी अटकेतील १७ जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून कार, टेम्पो व साहित्यासह ३२ लाख ९३ हजार ९० रुपयांचा ऐवज जप्त केला.

टेम्पोने केबल थेट दिल्लीत

बीएसएनएलची ऑप्टिकल फायबर केबल तोडण्यासाठी ही टोळी दिल्लीहून टेम्पोने शहरात आली होती. सरकारी काम असल्याचे बनावट पत्र सोबत बाळगायचे. त्यानंतर दुरुस्तीच्या नावाखाली मजुरांना रिफ्लेक्टर जॉकेट घालून ड्रेनेज लाइनची झाकणे उघडली जायची. हे काम टोळी रात्रीच करायची. त्यांच्याकडे विचारणा झालीच तर बनावट पत्र पुढे करून आपले काम टोळी रात्रीतून साध्य करायची. ड्रेनेजमधील वायर कापून क्रेनने ओढून एका ठिकाणी गोळा केल्यावर टेम्पोमध्ये भरून ते थेट दिल्ली गाठायचे.

यांनी केली कारवाई

पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक पवन इंगळे, गजानन सोनटक्के, सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, जमादार संतोष सोनवणे, विजय निकम, चंद्रकांत गवळी, राजेंद्र साळुंके, परभत म्हस्के, नितीन देशमुख, रवींद्र खरात, विलास मुठ्ठे, विशाल पाटील, राहुल खरात, नितीन धुळे, संदीप बीडकर, विजय भानुसे, धनंजय सानप, चालक रमेश गायकवाड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com