
गंगापूर : भरधाव टॅंकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना गंगापूर- भेंडाळा फाटा मार्गावर मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी घडली. धडकेनंतर दोघेही पंधरा-वीस फूट फेकले गेले. यात भागचंद बैनाडे यांचा जागीच, तर गंभीर जखमी सुरेश चरंडे यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.