
छत्रपती संभाजीनगर : नाशिक जिल्ह्यात तीन दिवसांच्या संततधारेनंतर शुक्रवारी (ता. २२) पावसाचा जोर ओसरला. गंगापूर धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. असे असले तरी पाण्याची आवक सुरूच असल्याने पैठणच्या जायकवाडी (नाथसागर) धरणातून विसर्ग दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवण्यात आला.