

Chh. Sambhajinagar Crime
sakal
शेंदुरवादा, (ता. गंगापूर) : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथील वैष्णवी संतोष निळ (वय १७) या बारावीतील विद्यार्थिनीचा शुक्रवारी (ता. १९) राहत्या घरात खून करण्यात आला होता. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच, वाळूज पोलिसांनी अवघ्या चार तासांत तपासाची चक्रे फिरवून आरोपी नानासाहेब कडुबा मोरे (वय २७) याला बेड्या ठोकल्या आहेत. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.