

Chh. Sambhajinagar Crime
sakal
गंगापूर : राहुल नवथर याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याचे मित्र कानिफनाथ मावस व योगेश नागे या दोघांवर गुन्हा नोंदविला. मद्यपान करताना वाद होऊन कानिफनाथने गावठी पिस्तूलमधून राहुलवर गोळीबार केला. दरम्यान, योगेशला पोलिसांनी अटक केली असून गंगापूर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.