gangster shubham jat arrested
sakal
छत्रपती संभाजीनगर - शहरातील कुख्यात गुंड शुभम जाटने जुन्या वादातून एकाच्या घरावर हल्ला केला. यावेळी मोठ्याने शिवीगाळ करीत असताना कुणी घराबाहेर न आल्याने त्याने थेट पिस्तुलाने गोळीबार केला. यात कुणी जखमी झाले नाही.
परंतु, या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. गोळीबारानंतर शुभम एका घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी शोध घेत त्याला टाकीतून पकडले. शिवाय अन्य सहा जणांना अटक केली.