

जयभवानीनगर (सिडको) : नवीन गॅस सिलिंडर आणि शेगडी घेतली. नवीन शेगडीला सिलिंडर जोडून काहीतरी गरमागरम करून खावे या विचारात असलेल्या कुटुंबाला पहिल्याच दिवशी लाखोंचे नुकसान सहन करण्याचा प्रसंग आला. सिलिंडर लावताना गॅसची गळती होऊन आग लागली. भेदरलेल्या कुटुंबाने त्यावर ओला कपडा टाकण्याऐवजी कोरडा कपडा टाकला आणि आग आणखीनच पेटली. या आगीत गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.