सिलिंडरचे सील काढताच गॅस गळती; कळंबमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सिलिंडरचे सील काढताच गॅस गळती; कळंबमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Published on
रेग्युलेटर लावताच गॅस गळती कळंबमध्ये सिलिंडरच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर कळंब, ता. २ (बातमीदार) : घरगुती वापराच्या सिलिंडरचे सील काढून रेग्युलेटर बसविताच गॅस गळती सुरू होण्याचा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एजाज शेख यांच्या घरी मंगळवारी (ता. एक) सिलिंडरमधून गॅस गळती झाली. गॅस सिलिंडर ग्राहकांच्या घरी पोचण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी केली जाते का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. सिलिंडरमध्ये रेग्युलेटर बसविण्याच्या जागेतील रबर वॉशर खराब असणे, तुटलेले असणे अथवा काही सिलिंडरमध्ये वॉशरच नसणे, अशा त्रुटी आढळत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्यामुळे रेग्युलेटर व्यवस्थित बसत नसल्याने सिलिंडर सुरू करताच गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. गॅस सिलिंडर घरपोच झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करताना गृहिणी रेग्युलेटर जोडतात. अशावेळी वॉशर नसल्यास किंवा खराब असल्यास रेग्युलेटर व्यवस्थित लॉक होत नाही. परिणामी, गॅस वेगाने बाहेर पडू शकतो. बंदिस्त जागेत मोठ्या प्रमाणात गॅस साचल्यास आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. कळंब शहर व तालुक्यात वितरित होणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन व गॅस वितरण कंपन्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com