कन्नड: पुणे-बारामती येथील साखर कारखान्याचा हंगाम संपवून मूळगावी परतणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आयशर टेंपोचा रविवारी (ता. २९) सकाळी साडेनऊला गौताळा घाटात अपघात झाला. .घाटातील म्हसोबा मंदिराजवळील अवघड वळणावर टेंपोचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दरीत कोसळले. यात सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील १३ मजूर जखमी झाले असून, त्यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे..Chhatrapati Sambhajinagar: जलवाहिनीची वेल्डिंग सुरूच; स्क्रोल व्हॉल्व्हजवळ पाइप टाकण्याचे विसरल्याने तांत्रिक अडचणी.सोयगाव येथील मुकादम सुखदेव पगारे यांच्या टोळीतील हे मजूर गेल्या चार महिन्यांपासून बारामती परिसरात ऊसतोडीसाठी गेले होते. काम संपवून सर्वजण आयशर टेंपोने (क्र. एमएच २१ बीएच ०४४२) घरी परतत असताना काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात घडला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच सायगव्हाण आणि भिलदरी तांडा येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली..Premium|Tribal Culture Tourism : वारली लोकपरंपरेची विलोभनीय अनुभूती....गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता, स्वतःच्या वाहनांतून जखमींना बाहेर काढून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कन्नड ग्रामीण रुग्णालयात डॉ. रुक्सार खान यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, वंदना अंभोरे, रुक्सना तडवी, दिव्या पगारे, सोमीबाई तडवी, रंजनाबाई पगारे, मनीषा वाघ आणि ममता वाघ या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे..आशाबाई पगारे, कोमल पगारे, ऋतिक पगारे, महेश माने, प्रवीण वाघ आणि सलीम तडवी या ६ जणांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. घटनेची नोंद कन्नड ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून, जमादार रवींद्र ठाकूर व प्रदीप पवार अधिक तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.