esakal | औरंगाबाद : ‘त्याच्या’ श्‍वासासाठी आईचे अपार दातृत्व । kidney
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’

औरंगाबाद : ‘त्याच्या’ श्‍वासासाठी आईचे अपार दातृत्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद :‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी आईची महती आपल्याकडे पूर्वीपासूनचीच. आपल्या लेकराचा श्‍वास अविरत ठेवण्यासाठी आईचे दातृत्व पुढे आले व तिने स्वत:ची किडनी देऊन पोटच्या गोळ्याचे प्राण वाचविले. अनिता किशोर निकम असे या मातेचे नाव आहे. शहरातील जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत किशोर रमेश निकम यांचा अकरा वर्षांचा एकुलता मुलगा प्रतीकच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. त्याला अधिकच त्रास जाणवू लागला व त्याच्यावर डायलिसिसवर जगण्याची वेळ आली.

हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील नवरात्रोत्सव रद्द

अशा परिस्थितीत पुढे जगणेही त्याला कठीण झाले. किडनीरोपणानंतरच तो जगण्याची शाश्‍वती होती. प्रतिकचा श्‍वास अविरत ठेवण्यासाठी त्याची आई अनिता निकम यांचे ममत्व पुढे आले. त्यांनी स्वत:ची किडनी मुलाला देण्याचा निर्णय घेतला परंतु दोघांचा रक्तगट भिन्न होता. त्यानंतरही सिग्मा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स गणेश बर्नेला, डॉ. सारूक, डॉ. अभय महाजन, डॉ. अरुण चिंचोले यांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आईने किडनी दिल्यामुळेच प्रतीकचे प्राण वाचले. ही शस्त्रक्रिया २२ सप्टेंबरला करण्यात आली. दोघांची प्रकृती उत्तम असून अनिता निकम यांना डॉक्टरांनी सुटी दिली असून त्यांना घरी पाठविण्यात आले.

loading image
go to top