

Education
sakal
छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी ‘जिओ टॅगिंग’ उपक्रमाची मोठ्या उत्साहात सुरवात झाली होती. शासनाने शैक्षणिक नियोजन अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रत्येक शाळेच्या भौतिक स्थितीची पारदर्शक नोंद ठेवण्यासाठी ही आधुनिक प्रक्रिया सुरू केली. मात्र, अर्धे शैक्षणिक वर्ष संपूनही छत्रपती संभाजीनगर विभागात ही मोहीम अर्धवट अवस्थेतच थांबली आहे.