Dhangar Community Man Dies
esakal
गेवराई शहरात धनगर समाजातील एकाची आत्महत्या
खिशात सापडलेल्या चिठ्ठीत एसटी आरक्षणाची मागणी
समाजबांधवांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
गेवराई (जि. बीड) : शहरातील ज्ञानदेव नामदेव कोल्हे (वय ४४, रा. संतोषनगर, गेवराई) यांनी सोमवारी (ता. सहा) घरी गळफास घेऊन आत्महत्या (Dhangar Community Man Dies) केली. पिठाची गिरणी चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.