esakal | घरबसल्या घ्या जनावरांच्या आजारांसंदर्भात माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

घरबसल्या घ्या जनावरांच्या आजारांसंदर्भात माहिती

घरबसल्या घ्या जनावरांच्या आजारांसंदर्भात माहिती

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद : पशु पालकांसाठी राज्य सरकार ‘महा पशुधन संजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १९६२ या टोल फ्री नंबर वर फोन करून पशुपालक हे घर बसल्या आपल्या जनावरांच्या आजारा संदर्भात सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

हेही वाचा: बीड जिल्ह्याची वाटचाल म्युकरमायकोसिस मुक्तीकडे

राज्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी शासनाच्यावतीने जानेवारीत महा पशूधन संजीवनी ही योजना ‘मुख्यमंत्री स्वास्थ योजने’त लागू केली आहे. या योजनेमार्फत पशू संदर्भात सर्व आजाराच्या उपचाराबाबत माहिती एका फोनवरून मिळणार आहे. यात पशूचे आजार, लसीकरण, कृत्रीम रेतन, पशू संगोपन अशा सेवांची माहिती मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी टोल-फ्री नंबर १९६२ या नंबरवर फोन करायचा आहे. दरम्यान ही सेवा राज्यात पहिल्या टप्यात ३१ जिल्ह्यात सुरू असून ८१ तालुक्यातही सेवा देण्यात येत आहे.

जनावराची अॅम्बुलन्स

दरम्यान जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री स्वास्थ योजने’अंतर्गत तीन फिरत्या जनावराची अॅम्बुलन्स मंजूर करण्यात आली आहे. त्यांपैकी सोयगाव तालुका हा दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी एक फिरती अॅम्बुलन्स वाहन मिळाली आहे. परंतु यासाठी लागणारे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे सोयगावातील एकट्या अधिकाऱ्यावर कामाचा तान पडत आहे.

जिल्ह्यात सोयगाव, सिल्लोड, कन्नड या तालुक्यात प्रथम श्रेणीच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात तसेच इतर अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात शासनाला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे त्या ठिकाणी पदावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होतो आहे. -डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

loading image
go to top