esakal | बीड जिल्ह्याची वाटचाल म्युकरमायकोसिस मुक्तीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

म्युकरमायकोसिस

बीड जिल्ह्याची वाटचाल म्युकरमायकोसिस मुक्तीकडे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात उद्‌भवलेल्या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस या भयंकर आजारातून जिल्हा मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. सध्या जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण उपचाराखाली आहेत. मात्र, कोरोना जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही. मंगळवारीही जिल्ह्यात नवीन ९४ रुग्ण सापडले. विशेष म्हणजे तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट आता अडीच टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

हेही वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार;पाहा व्हिडिओ

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट भयंकर प्रमाणात आल्यानंतर मे महिन्यात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजारानेही शिरकाव केला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत जाऊन २१७ पर्यंत गेली आहे. नाकावाटे, दात, डोळे, टाळू आणि मेंदूपर्यंत प्रादुर्भाव करणारा हा आजार जेवढा भयंकर तेवढाच उपचारही व शस्त्रक्रियाही खर्चीक होत्या. परंतु, आतापर्यंत स्वाराती रुग्णालयात १४० रुग्णांच्या सव्वा दोनशेंवर शस्त्रक्रिया झाल्या.

तर, जिल्हा रुग्णालयात देखील काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत स्वारातीमध्ये २०७ तर जिल्हा रुग्णालयात नऊ व एक रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार झाले. आतापर्यंत उपचारानंतर १५८ रुग्ण दुरुस्त झाले आहेत. तर, सध्या केवळ सहा रुग्ण स्वारातीत उपचार घेत आहेत. आतापर्यंत ३९ मृत्यू झाले आहेत. एकीकडे जिल्हा म्युकरमायकोसिस मुक्त होत असला तरी कोरोना जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही.

कोरोनाचे ९४ रूग्ण

मंगळवारी जिल्ह्यात ९४ रुग्णांची नोंद झाली तर नवीन एक मृत्यू झाला. ३६६४ लोकांच्या स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत ३५७० लोकांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आढळले. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण अडीच टक्क्यांच्या पुढे गेले आहे. सर्वाधिक २४ रुग्ण आष्टी तर बीडमध्ये २३ रुग्ण आढळले.

हेही वाचा: धक्कादायक! पोटच्या मुलीला तीन वेळा विकले

अंबाजोगाई पाच, धारुर नऊ, गेवराई १०, केज १०, माजलगाव तीन, पाटोदा सहा, शिरुर दोन व वडवणीत दोन रुग्ण आढळले. आापर्यंत जिल्ह्यात एक लाख १२२६ रुग्णांची नोंद झाली असून ९७ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन एका मृत्यूसह आतापर्यंत २७११ मृत्यूंची नोंद झाली. जिल्ह्यातील ९७९ रुग्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत.

loading image
go to top