
घाटी परिसर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) एकच सीटी स्कॅन मशीन आहे. यावर दिवसाकाठी तब्बल १७५ रुग्णांची तपासणी केली जाते. परिणामी, या एकाच मशीनवर रुग्ण तपासणीचा भार असल्याचे समोर आले. दुसरीकडे नवीन मशीन खरेदीचा प्रस्ताव मात्र रेंगाळल्याचे दिसते.