Chhatrapati Sambhajinagar: घाटनांद्रा परिसरात डोंगरची ‘काळी मैना’ दाखल;कडाक्याच्या उन्हातही करवंदांची मागणी जोरात; १८० ते २०० रुपयांचा दर

Arrival of Kali Maina in Ghatanandra: घाटनांद्रा बाजारात उन्हाळ्यात डोंगरची काळी मैना (करवंद) दाखल झाली आहे. १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दर असून, ग्राहकांची मागणी जोरात आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

घाटनांद्रा: उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील रानमेव्याची ओढ पुन्हा एकदा वाढली आहे. डोंगरदऱ्यांतील आंबट-गोड चवीची डोंगरची ‘काळी मैना’ अर्थात, करवंद अखेर घाटनांद्रा येथील बाजारात मे महिन्यात दाखल झाली आहेत.

मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, या रानमेव्याला महागाईची झळ बसली आहे. बाजारात करवंदांची विक्री १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दराने होत असली, तरी ग्राहकांची मागणी मात्र कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com