

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) ट्रॉमा इंटेन्सिव्ह केअर युनिट (टीआयसीयू) आणि वॉर्ड क्रमांक २९ चे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (ता.२७) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. १७ वर्षांनंतर या विभागांचा कायापालट झाल्याने गंभीर रुग्णांना अत्याधुनिक आणि कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. डीपीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीमुळे घाटीमध्ये आरोग्य सुविधांच्या आधुनिकीकरणाला वेग मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.