घाटीत औषधांसाठीची प्रतीक्षा २० मिनिटांवर

घाटीत औषधांसाठीची प्रतीक्षा २० मिनिटांवर
Published on: 
घाटीत औषधांसाठीची प्रतीक्षा २० मिनिटांवर ------------- घाटी परिसर, ता. २१ ः घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारानंतर औषधे मिळविण्यासाठी होणारी रुग्णांची प्रतीक्षा आता कमी झाली आहे. ओपीडीच्या तळमजल्यासह पहिल्या मजल्यावर औषधालय सुरू केल्याने रुग्णांना संबंधित विभागाजवळच मोफत औषधे मिळत आहेत. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांची औषधांसाठी होणारी धावपळ कमी झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दररोज अडीच ते तीन हजार रुग्णांची नोंद होते. त्यापैकी दोन हजारांहून अधिक रुग्णांना औषधांची आवश्यकता असते. पूर्वी औषध वितरण केंद्रावर गर्दी झाल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चिठ्ठीमुक्त घाटी’ संकल्पनेअंतर्गत औषधालय-दोनचे विस्तारीकरण करण्यात आले. आता अवघ्या २० मिनिटांत औषधे मिळत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तळमजल्यावरील औषधालयातून शस्त्रक्रिया, अस्थिव्यंगोपचार यांसह विविध विभागांतील रुग्णांना औषधे दिली जातात. पहिल्या मजल्यावरील केंद्रातून औषधोपचार, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग आणि वार्धक्यशास्त्र विभागांतील रुग्णांना औषधे उपलब्ध होतात. मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना महिन्याभराच्या गोळ्यांसह आवश्यक सिरप आणि इतर औषधेही मोफत दिली जातात. -------------- अशी आहे वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत औषध वितरण सुरू असते. रुग्णांना उपचारानंतर कमी वेळेत औषधे घेऊन परतता यावे, यासाठी दुसरे केंद्र सुरू केल्याचे डॉ. सुक्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com