

Chhatrapati Sambhajinagar
esakal
घाटनांद्रा: एकीकडे शाळेच्या भिंतीवर ‘शिक्षणापासून दूर करू नका’ असा उदात्त संदेश दिलेला असताना, प्रत्यक्षात मात्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सांडपाणी पसरले आहे. घाटनांद्रा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर गटारीचे पाणी तुंबल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.