Girja River: फुलंब्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे गिरजा नदीने धोकादायक पातळी ओलांडली असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठपासून दूर राहण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
फुलंब्री : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गिरजा नदीने मोठी उंची गाठली असून, नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याची माहिती समोर आली आहे.