

Engineering Admission
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील बीई, बीटेक पदवी अभ्यासक्रमांच्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सोमवारी (ता. १५) पूर्ण झाली. यावर्षी राज्यात २२ हजार ७१३ जागांची वाढ झाली. प्रवेशाचा आकडा तुलनेने वाढला असून टक्का मात्र अर्ध्याने घसरला. प्रवेशात विद्यार्थिनींची संख्या दोन टक्क्यांनी वाढून ३७.३० टक्के झाली. तर, विद्यार्थ्यांची संख्या दोन टक्क्यांनी घटून ६२.७० टक्के झाली.